शटर बांधकामाच्या कारणाने झालेल्या वादावरून सख्या भावाने लहान बहिणीला लोखंडी रॉड ने मारहाण केल्याचा धक्कादायक घटना छावणी भागातील नंदनवन कॉलोनी भागात घडली.
राजेश्री तुकाराम बागुल वय-20 (रा.नंदनवन कॉलोनी) असे जखमी बहिणीचे नाव आहे तर सुनील तुकाराम बागुल असे मारहाण करणाऱ्या भावाचे नाव आहे.
राजश्री आणि सुनील दोघेही सख्खे भाऊ बहीण आहेत.राजेश्री च्या नावावर असलेल्या जागेत ती शटर चे काम करीत असताना त्यावरून दोघात वाद झाला. त्यानंतर खाली पडलेल्या लोखंडी रॉड ने सुनील ने बहीण राजेश्रीला मारहाण केली.या प्रकरणी बहिणीच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास साह्ययक पोलीस उपनिरीक्षक सुरेश जिरे हे करीत आहेत.












